Topper’s Opinion

Student Opinions
 • दिगंबर गणेश सराफ विद्यालय, संगमनेर

  'महाएक्साम' स्कॉलरशिप परिक्षेचा 'आरसा'! जेवढे गुण महाएक्सामला (२७६/३००) अगदी तेवढेच तंतोतंत शासकीय स्कॉलरशिपला!

  माझे नाव अनय अमर रसाळ आहे. मी दिगंबर गणेश सराफ विद्यालय, संगमनेर येथे शिकत आहे. यापूर्वी पहिली ते चौथी मी इंग्लिश माध्यमातून पूर्ण केले नंतर पाचवीमध्ये माध्यम बदलल्यामुळे मला मराठी शिकताना बऱ्याच अडचणी आल्या आणि स्कॉलरशीपची परीक्षा मराठी माध्यमातून देणे जरा कठीण वाटत होते, परंतू स्कॉलरशिप पूर्वी ‘सर फाउंडेशन’ तर्फे ‘महाएक्झाम’ (MahaExam) ही परीक्षा घेण्यात आली याचा मला खूप फायदा झाला. या परीक्षेचे स्वरूप खूप छान होते. त्यामुळे स्कॉलरशीप परीक्षेची पूर्व तयारीच झाली. महाएक्झामचे जे प्रश्नसंच मिळाले ते मी सर्व सोडवले. त्यामुळे स्कॉलरशिप परीक्षेचीही तयारी चांगली झाली.

  ‘महाएक्झाम’ म्हणजे खरचं स्कॉलरशीपची रंगीत तालीमच त्यामुळे प्रत्येकाने या परीक्षेचा लाभ घ्यावा व ही परीक्षा प्रत्येकाने द्यावी. मला अगदी तंतोतंत महाएक्झाम एवढेच (276/300) मार्क स्कॉलरशिप (276/300) परीक्षेत मिळाले. त्यामुळे ‘महाएक्झाम’ने स्कॉलरशिप निकालाचा पूर्ण अंदाज अगोदरच दिला असं म्हणता येईल.

  ‘महाएक्झाम’ला खरोखर धन्यवाद!

 • सन 2016-17 सालामध्ये घेण्यात आलेल्या महाएक्झाम मध्ये माझा प्रथम क्रमांक (इ.8वी) आला तसेच सरकारी स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक मिळाला.

  सदर परीक्षांमुळे मुख्य स्कॉलरशिप परीक्षेबद्दलचा आत्मविश्वास वाढला. पेपरचा दर्जा, काठिण्य पातळी चांगली होती. प्रत्येक सराव संच लिफाफा बंद असल्याने परीक्षेबद्दलची गोपनीयता काय असते हे दिसून येते.

  सर फाउंडेशनने सुरू केलेली MahaExam नक्कीच सुंदर व चांगली आहे. त्याचे सर्व श्रेय आपणास जाते.

  ‘महाएक्झाम’ला खरोखर धन्यवाद!

 • मराठा हायस्कूल ,नाशिक-२

  महाएक्झामच्या पूर्व उच्च्य प्राथमिक -५ वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेकरिता मी प्रविष्ठ झालो होतो. नुकताच पूर्व उच्च्य प्राथमिक -५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत मी ३०० पैकी २६४ गुण प्राप्त करत नाशिक जिल्ह्यात तिसरा व राज्यात ५ वा क्रमांक प्राप्त केला. माझी मराठा हायस्कूल शाळा, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था , आई-पप्पा यांच्यासोबतच महाएक्झामच्या सराव पॅटर्नमुळे मला हे यश मिळाल्यामुळे मी आपण सर्व टीमचे आभार मानतो!

  नवा व कठीण अभ्यासक्रम, सराव साहित्याचा अभाव ,खूप कमी वेळ या पार्श्वभूमीवर या परीक्षेचे आव्हान सहज पेलण्यासाठी महाएक्झामच्या दर्जेदार परीक्षांचा व सराव साहित्याचा खूप फायदा झाला.परीक्षेची हुबेहूब तालीम व ऑनलाईन निकाल यामुळे मुख्य परीक्षेचा ताण खूपच कमी झाला. त्यामुळेच मी महाएक्झामच्या सराव परीक्षेच्या इतके गुण प्राप्त करू शकलो.

  सर फाऊंडेशन व आदरणीय हरीश बुटले सरांचे खूप खूप आभार.

Links

Concept By : Harish Butle